34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमुंबईकट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊच शकत नाही : संजय राऊत

कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेऊच शकत नाही : संजय राऊत

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे पत्र समोर आले आहेत. सचिन वाझेंनी त्यांच्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या आरोपांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन वाझे यांनी आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर संजय राऊत यांनी ही कोणताही शिवसैनिक बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही. असे म्हणत अनिल परब यांची बाजू सावरली आहे.

‘महाराष्ट्रा सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरु आहे. तसा प्रयत्न करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर येत आहेत. हा एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. ज्यात जेलमध्ये आहेत त्यांच्याकडून पत्र लिहून घ्यायचे आणि सरकारविरोधात आवाज उठवायचा. या प्रकारचं घाणेरडे राजकारण या देशात आणि राज्यात याआधी झालेले नाही,’ असे म्हणत राऊतांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

यामध्ये अनिल परब यांचे नाव आले आहे. अजित पवार, अनिल देशमुख यांचे नावे आले आहे. गुन्हा केल्याने अटकेत असलेल्या आरोपींकडून जेलमध्ये लिहून घेतले जाते आणि तो पुरावा म्हणून समोर आणले जाते. हे राजकीय षडयंत्र आहे. मी अनिल परब यांना ओळखतो. अशा कामांत ते कधीच नसतात. कोणताही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही. काल त्यांनी शपथ घेऊन आरोप खोटे असल्याचं सांगितलं असून माझ्या त्यांच्यावर विश्वास आहे,’ असे ही संजय राऊत यांनी नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी